November 14, 2025 11:55 pm

सिन्नर : बिबट्याचा गोठ्यात शिरून पुन्हा हल्ला. दोन कालवडी ठार, परिसरामध्ये भीतीचे वातावरण ✒️प्रतिनिधी ✍️ मारुती दराडे . 📱 +91 8888090906

Updated by स्टार वन न्युज मराठी ™

Star One News Marathi
मारुती दराडे
प्रतिनिधी ✍️ मारुती दराडे
प्रतिनिधी ✍️ मारुती दराडे

नाशिक (सिन्नर) : नळवाडी ✍️ 

✍️नळवाडी शिवारातील  रायदुर्ग परिसरातील शेतकरी भानुदास माधव घुले यांच्या  गोठ्यात रात्री  11 वाजता बिबट्या ने  प्रवेश करून दोन कालवडी  ठार केल्या.परिसरातील नागरिकांकडून अनेक वेळा पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करण्याची मागणी केली परतू प्रशासनाकडून त्यांना केराची टोपली दाखवण्यात आली आहे.

  नळवाडी भागात  शुक्रवारी (दि. 18) रात्री सुमारास बिबट्याने कालवडीवर हल्ला चढवत दोन कालवडी ठार केल्या. त्यामुळे शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण पसरले आहे. परिसरात बिबट्याचा संचार वाढल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण आहे.

परिसरातील आठ ते दहा कुत्रेही तसेच अनेक शेळी,कालवडी बिबट्याने यापूर्वीच फस्त केल्या आहेत. काही वेळेस बिबट्या शिकारीच्या नादात विहिरीमध्ये पडल्याची घटना याच परिसरात घडून गेली आहे.. तसेच बिबट्या हा दिवसा सुद्धा काहीना दृष्टीस पडल्याने शाळेत जाणारे मुला मुलींच्या आई वडिलांना काळजी लागलेली असते. तेव्हा वनविभागाने लवकरात लवकर पिंजरा लाऊन बिबट्या चा बंदोबस्त करावा. अन्यथा उद्या माणसावर हल्ला केल्यास सर्वस्वी जबाबदार वनविभाग आणि प्रशासन असेल.

असा आक्रोश परिसरातून निघत आहे.

Star One News Marathi
Star one news Marathi
वनविभागाचे हर्षल पारेकर वनपरिक्षेत्र अधिकारी सिन्नर, यांच्या मार्गदर्शनानुसार , महेश वाघ,वनपाल नांदुर शिंगोटे आकाश रुपवते साहेब,संतोष मेंगाळ, रामनाथ अगिवले, यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली स्टार न्यूज मराठी वार्ताहर सिन्नर मारुती दराडे*प्रतिनिधी ✍️ मारुती दराडे . 📱 +91 88880 90906

Leave a Comment

और पढ़ें

🌍 शनिशिंगणापूरमध्ये देवस्थानकडून मानधनावर पुजारी नियुक्त.पुजाऱ्यांना भक्तांकडून रोख स्वरूपात अथवा ऑनलाईन रक्कम स्वीकारता येणार नाही.मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष दरंदले यांची माहिती.

best news portal development company in india

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

🌍 शनिशिंगणापूरमध्ये देवस्थानकडून मानधनावर पुजारी नियुक्त.पुजाऱ्यांना भक्तांकडून रोख स्वरूपात अथवा ऑनलाईन रक्कम स्वीकारता येणार नाही.मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष दरंदले यांची माहिती.