April 19, 2026 3:47 pm

Sangamner Crime: कायद्याचा धाक संपला.भरदिवसा भारत गुंजाळ ने साथीदारसह आई वडिल तसेच सख्या भावावर लोखंडी रॉड-काठ्याने केली अमानुष मारहाण; भारत गुंजाळ अटक बाकी आरोपी मोकाट.

Updated by स्टार वन न्युज मराठी ™ 

27 जानेवारी 2026

संगमनेर ✍️जवळे कडलग 

 अहिल्यानगर जिल्ह्यात पुन्हा गुन्हेगारी वाढली आहे, संगमनेर येथील जवळे कडलग येथे लोखंडी रॉड, लाकडी दांड्यांनी,  जालिंदर गुंजाळ तसेच आईवडील ना त्यांच्याच मुलाने लोखंडी रॉड ने बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

 भारत गुंजाळ याने आपले साथीदार आणि आपली बायको या सर्वांनी मिळून मारहाण केल्याबाबत संगमनेर तालुका पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा घटनाक्रम थरकाप उडवणारा आहे. 

 

✍️अहिल्यानगर जिल्हा हा दिवसेंदिवस गुन्हेगारांचे घर बनत चालला आहे. पुन्हा एकदा संगमनेर तालुक्यात एक बेदम मारहाणीची घटना घडली आहे. 

 . ही घटना संगमनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील, जवळे कडलग गणोरे (शिव) गावात सुमारे ७ दिवसांपूर्वी घडली आहे. जालिंदर गुंजाळ असे जखमी तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 

 

दिनांक 22/01/2026 रोजी दुपारी 12/00 वा. ते 12/30 वा. चे सुमारास जालिंदर गुंजाळ हा मोटारसायकल वरुन जवळ कडलग शिवारातील शेताचे बाजुचे रोडणे गणोरे कडे जात असताना सैलानीबाबा मंदिराचे जवळ रोडवर मोटार सायकल आडव्या लावलेल्या होत्या पुढे जाण्यासाठी रोड नसल्याने जालिंदर ने कोणची मोटारसायकल आहे, मोटारसायकल बाजुला काढून घ्या असे बोलला असता आरोपी भाऊ भारत शदर गुंजाळ हा आला व तो आपला भाऊ जालिंदर यास म्हणाला, तुला मळ्यात कोणी यायला सांगीतले. असे म्हणुन त्याला मारहाण करुन लागला. त्यावेळी त्याची बायको रोहिणी गुंजाळ व योगेश गुंजाळ, नितीन गुंजाळ हे तेथे आले. योगेश व नितीन यांनी जालिंदर गुंजाळ यास पकडले व रोहिणी गुंजाळ हिने जालिंदर ला लाकडी काठीने डोक्यात मारले त्यानंतर भारत गुंजाळ याने लोखंडी रॉडने डोक्यात मारले असता डोक्यातून रक्त येऊ लागले तिथेच जालिंदर गुंजाळ हा बेशुद्ध होऊ लागला हे बघून 

 

आणि भांडणाचा आवाज ऐकुन त्याचे आई वडील शरद भिकाजी गुजाळ व आई अलका शदर गुंजाळ हे भांडण सोडविण्यासाठी आले असता भारत गुजाळ याने स्वतः च्या आईवडीलांना लाकडी दांडक्याने मारहाण केली व आई अलका हिला रोहिणी गुंजाळ हिने हात पिरगळुन जमीनीवर आपटले शिवीगाळ दमदाटी करून येथून निघून जा नाहीतर मारून टाकू धमकी दिली.

 

भांडणामध्ये जालिंदर गुंजाळ यास गंभीर दुखापत होऊन डोक्याला उजव्या खांद्यावर, व हातावर तसेच दोन्ही पायावर लाकडी दांडक्याने रॉडने मारल्याने जबर जखमी झाला.   

 वडील शरद भिकाजी गुंजाळ याना डाव्या हाताला फॅक्चर झाले असून व आई अलका हिला हाता पायाला व पाठीला मार लागला आहे.

या नुसार 

 

 दि 22/01/2026 रोजी आरोपी भारत गुंजाळ ,रोहिणी गुंजाळ,योगेश गुंजाळ व नितीन गुंजाळ रा. गणोरे ता. अकोले 

  • यांच्या विरोधात FIR NU 0035 भारतीय न्याय संहिता BNS 2023 नुसार कलम 

118(2) .118(1). 115(2). 3(5) अन्यंवे संगमनेर तालुका पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद झाला असून 

आरोपी भारत गुंजाळ याला पोलिसानी अटक केली असून त्याला न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालायाने त्याला 4 दिवसाची पोलिस कस्टडी दिली होती.

बाकी आरोपी फरार असून बाकी आरोपी ना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी जखमी युवकाचा भाऊ गणेश गुंजाळ याने केली आहे 

 

  • जर बाकी आरोपी ना लवकरात लवकर अटक नाही केली तर अहिल्यानगर येथील SP कार्यालयापुढे आमरण उपोषण करणार असल्याचा पवित्रा गणेश गुंजाळ याने घेतला असून पोलिस यावर काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
oplus_34
oplus_34

अमानुष मारहाण केल्यामुळे जालिंदर गुंजाळ याच्या डोक्याच्या कवटीला क्रॅक गेला असून तो काही वेळ बेसुद्ध होता डॉक्टरांच्या त्वरित उपचाराने जालिंदर गुंजाळ हा सावध झाला असून आरोपी विरोधात प्रशासनाने कडक पावले उचलण्याची गरज आहे 

  •  आरोपी भारत गुंजाळ यांच्यावर आधी सुद्धा केस दाखल असून जखमी जालिंदर गुंजाळ आणि गणेश गुंजाळ तसेच आई वडिल यांना कुऱ्हाड हातात घेऊन मारहाण करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता तेव्हा ही घरच्यांनी त्याच्यावर केस दिली होती परंतु तेव्हा तो दोन ते तीन दिवसात जेल मधून बाहेर आला होता.. आता त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला असल्याने संपूर्ण कुटुंबाला जगणे मुश्किल झाले आहे 

 

भारत गुंजाळ याने शेतात मध्ये एक दर्गा बांधली असून त्या सैलानी बाबा ची रोज पूजा आरती होते आणि अनेक बाहेरील लोक या ठिकाणी आपले गाऱ्हाणे घेऊन येत असतात तसेच ज्यांना मुले नाही त्यांना येथे आले तर मुले होतात असे अनेक धक्कादायक अघोरी प्रकार या ठिकाणी होताना लोक सांगतात..

  • नक्की या मंदिरात हिरवे झेंडे हिरव्या शाली कश्यासाठी हा प्रश्न लोकांना पडला असून अंधश्रधा निर्मूलन वाल्यांनी या ठिकाणी येऊन जातीने लक्ष घालण्याची गरज आहे. 

पोलिसांनी ही या दर्ग्याच्या पाहणी करून हे बांधकाम त्वरित पाडून टाकले पाहिजे आणि आरोपी विरोधात कडक पावले उचलली पाहिजे.

 

 आरोपी भारत गुंजाळ या आरोपी वर आता कडक कार्यवाही केली नाही तर हा सुटून आल्यावर संपूर्ण कुटुंबाला संपू शकतो हे नक्की 

              ✍️भाऊ गणेश गुंजाळ याने आरोपीविरोधात, तीव्र संताप व्यक्त केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल महाजन साहेब करत असून, आरोपीविरोधात योग्य ती कारवाई केली जाईल, राहिलेले आरोपी ही आम्ही लवकरात लवकर अटक करू असे पोलिसांनी सांगितले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

🌍 शनिशिंगणापूरमध्ये देवस्थानकडून मानधनावर पुजारी नियुक्त.पुजाऱ्यांना भक्तांकडून रोख स्वरूपात अथवा ऑनलाईन रक्कम स्वीकारता येणार नाही.मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष दरंदले यांची माहिती.

best news portal development company in india

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

🌍 शनिशिंगणापूरमध्ये देवस्थानकडून मानधनावर पुजारी नियुक्त.पुजाऱ्यांना भक्तांकडून रोख स्वरूपात अथवा ऑनलाईन रक्कम स्वीकारता येणार नाही.मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष दरंदले यांची माहिती.